मागील वर्षीच्या तुलनेत यंदा द्राक्षांची अधिक निर्यात झाल्याने लोकल बाजारपेठेचा भाव निर्यातीला मिळत असल्याने बागायतदारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. भारतीय द्राक्षांची सर्वाधिक मागणी असलेल्या युरोप प्रांतात यंदा अपेक्षेपेक्षा जास्त कंटेनर निर्यात झाल्याने भाव जरी कोसळले असले तरी ते स्थिर आहे.
पुणे जिल्हा परिषदेत सरकारी नोकरची मोठी संधी
पुणे – पुणे जिल्हा परिषदेत सरकारी नोकरीची मोठी संधी आहे.पुणे जिल्हा परिषदेअंतर्गत सरळसेवेची रिक्त पदे भरण्यात येणार असून, राज्य शासनाच्या ग्रामविभागाकडून 26 मार्चपासून ऑनलाइन अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला सुरूवात झाली आहे. त्यामध्ये गट- क संवर्गातील अनुसूचित क्षेत्राबाहेरील (बिगर पेसा) 584 पदे आणि अनुसूचित क्षेत्रातील (पेसा) 11 पदे असे एकूण 595 पदांची भरती करण्यात येणार असून, जिल्ह्यातील तरूणांसाठी ही सुवर्ण संधी आहे. त्यामुळे पहिल्या दिवसापासून ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी तरूणांची धडपड सुरू आहे.
मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या आस्थापनेवरील गट-क संवर्गातील रिक्त पदे भरण्यात येणार आहे. या भरतीसाठी www.mahapariksha.gov.in या संकेतस्थाळावर उमेदवारांना ऑनलाईन अर्ज भरता येणार आहे
दरम्यान, भरती पक्रियेत अनुसूचित क्षेत्रातील (बिगर पेसा) आरोग्य सेविका – 272, सेवक (पुरूष) – 61 आरोग्य सेवक (पुरूष, हंगामी फवारणी कर्मचारी) – 112, कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) – 15, कंत्राटी ग्रामसेवक – 15, औषध निर्माता – 16, प्रयोगशाळा तंत्रज्ञ – 3, विस्तार अधिकारी (कृषी) – 3, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक – 51, पशुधन पर्यवेक्षक – 4, वरिष्ठ सहाय्यक (लेखा) – 13, पर्यवेक्षिका (नामनिर्देशनाने) – 5, वरिष्ठ सहाय्यक (लिपीक) – 10, कनिष्ठ लेखाधिकारी 4 ही पदे भरण्यात येणार आहे. तर अनुसूचित क्षेत्रातील (पेसा) : आरोग्य सेवक (पुरूष, हंगामी फवारणी कर्मचारी) 1 आणि आरोग्य सेविका 10. अनुसूचित क्षेत्रातील संवर्गनिहाय पदे ही शासन अधिसूनेनुसार जिल्ह्यातील स्थानिक अनुसूचित जमातीतील उमेदवारांसाठी राखीव असून, स्थानिक उमेदवारांनाच अर्ज करता येणार आहे
पिंगोरी येथे जैवविविधता संवर्धन प्रशिक्षण यावर एकदिवसीय कार्यशाळा आयोजित .
सासवड : महाराष्ट्र राज्य जैवविविधता मंडळ, वाघिरे महाविद्यालय, सासवड वनस्पतिशास्त्र विभाग आणि इला फौंडेशन, पिंगोरी यांच्या संयुक्त विद्यमाने इला फौंडेशन, पिंगोरी येथे जैवविविधता संवर्धन प्रशिक्षण यावर एकदिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेसाठी महाविद्यालयातील ५० विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला होता.
कार्यक्रमाचे उदघाटन इला फौंडेशनचे संस्थापक डॉ. सतीश पांडे व प्राचार्य. नितिन घोरपडे यांच्या हस्ते झाले. या वेळी बोलताना प्राचार्यांनी जैवविविधता संवर्धनाची खूप गरज असून यासाठी वाघिरे महाविद्यालय आणि इला फौंडेशन यांच्यात करार करण्याचे आश्वासन दिले. तसेच डॉ. सतीश पांडे यांनी जैवविविधता संवर्धन, पारंपरिक जीवनपद्धती आणि निसर्ग, निसर्ग संवर्धनाबद्दलचा वैज्ञानिक दृष्टिकोन आणि संधी यावर मुलांना खूप उपयुक्त मार्गदर्शन केले. यावर विद्यार्थ्यांनीही सकारात्मक प्रतिक्रिया देऊन निसर्ग संवर्धनासाठी आम्हीही आमचा वाटा उचलू, असे सांगितले. कार्यशाळेच्या सुरुवातीला विद्यार्थ्यांनी इला फौंडेशनच्या परिसरात श्रमदान केले. कार्यशाळेच्या प्रथम सत्रात राजकुमार पवार यांनी पिंगोरी आणि इला फौंडेशन परिसरातील जैवविविधता व तिचे महत्व यावर मार्गदर्शन केले . प्रमोद देशपांडे यांनी पक्षी निरीक्षण : एक छंद यावर चर्चा केली.
द्वितीय सत्रात डॉ. एन. एम. महाजन यांनी टाकाऊ वस्तूपासून पक्ष्यांची घरटी, पक्षासाठी पाणीसाठे कसे बनवावेत हे मुलांना शिकवले. तसेच प्रेरणा सेठिया यांनी अवैध तस्करीबद्दल उपयुक्त माहिती दिली. अभिराम राजंदेकर यांनी विद्यार्थ्यांना विविध पक्ष्यांच्या आवाजांची ओळख करून दिली. कार्यक्रमाचे आभारप्रदर्शन डॉ. स्वप्नील जगताप आणि प्रा. निखिल गुरव यांनी केले. या कार्यशाळेसाठी प्राचार्य डॉ. नितीन घोरपडे, इला फौंडेशन चे संस्थापक डॉ. सतीश पांडे, राजकुमार पवार, वनस्पतिशास्त्र विभागप्रमुख डॉ. टी. टी. माने, कार्यशाळा समनव्यक डॉ. स्वप्नील जगताप, प्रा. निखिल गुरव, प्रा. अश्विनी बेलदार, संतोष पवार, संतोष लोणकर उपस्थित होते.
———————————————————
निर्यातक्षम द्राक्षांना कवडीमोल भाव
आधुनिक तंत्रज्ञानाच्या साह्याने हनुमान व्यायाम प्रसारक मंडळातील अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी दाभा गावातील एका खासगी शेतात स्ट्रॉबेरीची शेती फुलविली आहे.. आयआयटी दिल्लीची चमू या प्रकल्पाची पाहणी करणार आहे.
श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी दाभा येथील एका शेतात जागा घेऊन स्ट्रॉबेरी शेतीचा प्रकल्प उभारला. त्यामध्ये स्ट्रॉबेरी शेतीच्या माध्यमातून उन्नत भारत अभियानांतर्गत हव्याप्र अभियांत्रिकी महाविद्यालयाने बदल घडवून आणला आहे. शेतीशी दूरदूरपर्यंत संबंध नसलेल्या इलेक्ट्रॉनिक्स अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांनी ही शेती फुलविली. अभियांत्रिकी महाविद्यालयाचे संचालक डॉ. श्रीकांत चेंडके यांच्या पुढाकाराने बडनेरानजीक दाभा येथे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए.बी मराठे यांच्या मार्गदर्शनाखाली स्ट्रॉबेरी प्रकल्प डिसेंबर-२०१८ मध्ये सुरू करण्यात आला होता. प्रकल्प प्रमुख इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन विभागप्रमुख उज्ज्वला क्षीरसागर व आशिष खराते यांच्या मार्गदर्शनाखाली अवघ्या तीन महिन्यांत प्रकल्प साकारला. स्ट्रॉबेरी पीक ठरावीक क्षेत्र आणि वातावरणामध्येच घेतले जाते; इतर कुठल्याही भागात हे नगदी पीक घेता येत नसल्याचे खोडून काढत, पिकांना आवश्यक तेवढे तापमान व मातीची क्षमता वाढवून तंत्रज्ञानाच्या माध्यमातून कुठलेही पीक घेता येते, हे अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी सिद्ध केले. प्रकल्पाला शेतमालक नारायणराव वैद्य, वीजपुरवठा करणारे नामदेवराव टेंभुर्णे, पाणी उपलब्ध करणारे पंकज लढ्ढा, खतांचा पुरवठा करणारे रवि वाठ यांचे मोठे सहकार्य लाभले. प्रकल्पाकरिता शुभम किन्हीकर, ऋषिकेश सपकाळ, विशाल कुकडे, उदीत मिश्रा, प्रियंता चोरडे, प्रगती उमेकर, दीक्षिता बोरेकर, दीक्षा राऊत, रमेश गजबार, प्रतीक गावंडे, शाम नाले, शहीद शेख, मो. साद हुसैन या विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.
६२ किलोचे घेतले पीक
विद्यार्थ्यांनी निवड केलेल्या शेतामध्ये ग्रीन हाऊस व स्ट्रॉबेरी पिकासाठी आवश्यक वातावरण निर्मिती करीत जानेवारी ते मार्च अवघ्या अडीच महिन्यांत तब्बल ६२ किलो पीक घेतले. अशा प्रकारचा प्रकल्प संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठस्तरावर प्रथम ठरला असून, या यशस्वी प्रकल्पाची दखल शासन, प्रशासन व देशातील ख्यातनाम शास्त्रज्ञांनीसुद्धा घेतली आहे.
स्ट्रॉबेरी प्रकल्पाने शिक्षणाची व्याख्या बदलली
हव्याप्र अभियांत्रिकी महाविद्यालयाने साकारलेली स्ट्रॉबेरी शेती प्रकल्प सर्वांगीण विकासाचा प्रकल्प ठरला आहे. या प्रेरणेतून संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ मोठ्या स्तरावर असा प्रकल्प साकार करून विद्यार्थ्यांच्या सक्षमीकरणावर भर देईल, असा विश्वास कुलगुरू मुरलीधर चांदेकर यांनी उद्घाटन सोहळ्यात व्यक्त केला. व्यासपीठावर श्रीकांत चेंडके, प्राचार्य मराठे, रजिस्ट्रार एस.व्ही. ढोले, उज्ज्वला क्षीरसागर, उन्नत भारत अभियानाच्या प्रादेशिक समन्वयक अर्चना बारब्दे यांच्यासह सर्व विभागप्रमुख व शिक्षक आदी मान्यवर उपस्थित होते.
पक्ष्यांसाठी अर्धा एकर ज्वारीचे पीक
आपण घरात प्राणी-पक्षी पाळून त्यांना पाणी, चारा देऊन त्यांचे संगोपन करणारे अनेक जण आपण पाहतो; पण सद्य:स्थितीत वाढत्या शहरीकरणामुळे पक्ष्यांच्या निवाऱ्याबरोबरच त्यांना खाद्य मिळणेही अवघड झाले आहे.
By ऑनलाइन लोकमत | Follow | Published: March 20, 2019 01:40 AM | Updated: March 20, 2019 01:44 AM
Half acre jowar crop for birds | पक्ष्यांसाठी अर्धा एकर ज्वारीचे पीक
पक्ष्यांसाठी अर्धा एकर ज्वारीचे पीक
चाकण – आपण घरात प्राणी-पक्षी पाळून त्यांना पाणी, चारा देऊन त्यांचे संगोपन करणारे अनेक जण आपण पाहतो; पण सद्य:स्थितीत वाढत्या शहरीकरणामुळे पक्ष्यांच्या निवाऱ्याबरोबरच त्यांना खाद्य मिळणेही अवघड झाले आहे.
या पार्श्वभूमीवर खराबवाडीतील प्रगतिशील शेतकरी ज्ञानेश्वर ऊर्फ बाबासाहेब शिवराम कड या शेतकऱ्याने अर्धा एकर क्षेत्रातील ज्वारीचे पीक चक्क पक्ष्यांना खाण्यासाठी राखून ठेवले आहे. ज्वारीच्या उत्पन्नाचा त्याग करून त्यांनी दाखविलेल्या पक्षीमायेचे पक्षीप्रेमींमधून त्यांचे कौतुक होत आहे.
ज्ञानेश्वर कड यांची खराबवाडी परिसरात चार एकर शेती आहे. यातील अर्धा एकर क्षेत्रात त्यांनी ज्वारीचे पीक घेतले आहे. या सर्व क्षेत्रांतील ज्वारीचे उभे पीक कड यांनी पक्ष्यांसाठी राखून ठेवले आहे. सध्या त्यांच्या ज्वारीच्या पिकात अनेक प्रकारचे पक्षी सकाळ-संध्याकाळ येत असतात. काही पक्ष्यांनी तर या ठिकाणी असलेल्या मोठ्या झाडांवर आपली घरटी केली आहेत. कड यांनी शेजारीच असलेल्या
नारळाच्या झाडांना मडकी बांधली आहेत. जेणेकरून पक्ष्यांना पिण्यासाठी पाणी मिळावे.
आज राज्यात दुष्काळी परिस्थिती आहे. त्यामुळे ज्वारीचे क्षेत्र कमी झाले आहे. त्यामुळे उन्हाळ्यात पक्ष्यांना चारा व पाण्याच्या शोधात भटकावे लागत आहे; तसेच वाढत्या शहरीकरणामुळे पक्ष्यांच्या राहण्याबरोबरच त्यांच्या खाण्याचाही प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे शेतातील ज्वारीचे पीक पक्ष्यांना दान करण्याचा निर्णय आमच्या कुटुंबातील सदस्यांनी घेतला असून, ज्वारीच्या उत्पादनाचा त्याग करून ते पक्ष्यांसाठी राखून ठेवत आहे.
पुरंदर तालुक्यातील नवीन गावाचा शोध?
सासवड : सासवड शहरातून जाणाऱ्या सासवड-कापूरहोळ रस्त्यावरील सासवड तहसीलदार कार्यालयाच्या कोपऱ्यावर असलेला वळणरस्ता सरळ करण्याची मागणी नागरिकांच्या वतीने करण्यात येत आहे; तसेच न्यायालयाच्या बाजूस रस्त्याच्या कडेला या रस्त्यावरील गावे आणि त्या गावांचे किलोमीटरमधील अंतराचा सूचनाफलक लावलेला असून या फलकावरती ‘बालाजी मंदिरऐवजी बालाजीनगर’ असा गावाचा उल्लेख केलेला आहे. ज्या रस्त्यावर ती सूचना फलक किंवा दिशादर्शक फलक सार्वजनिक बांधकाम विभाग लावत आहे, त्या रस्त्यावरील गावे ही माहिती नसावी, अशी अवस्था सध्या फलकापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या पुरंदर सार्वजनिक बांधकाम विभागाची झालेली दिसते.
पुरंदरच्या दक्षिण भागात टँकरने पाणीपुरवठा
नीरा : पुरंदरचा दक्षिण-पूर्व पट्टा कायम टंचाईग्रस्त म्हणून घोषित असतो. या वर्षी मात्र ऐन उन्हाळ्यात एकाही वस्तीवर टँकरची गरज भासली नव्हती. मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात विहिरींची पाणीपातळी खालावली. त्यामुळे शासनदरबारी हेलपाटे मारण्यापेक्षा येथील लोकांनी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टकडे तातडीने पिण्याच्या पाण्याच्या टँकरची मागणी केली होती. मे महिन्यापासून आजपर्यंत सलग २ टँकरने तीन गावांतील सात वाड्या-वस्त्यांवर पिण्याच्या पाण्याची सोय केली जात आहे.
डेरवण : कोकणातील डेरवण येथे श्री विठ्ठलराव जोशी चॅरिटीज ट्रस्टच्या वतीने होणारा राज्यस्तरीय क्रीडा महोत्सव संस्थेच्या क्रीडासंकुलात जोरात सुरु झाला आहे. प्रतिवर्षीप्रमाणे यंदाही खो खो, कबड्डी, फुटबॉल, लंगडी, बुद्धिबळ, व्हॉलीबॉल, नेमबाजी, अॅथलेटीक्स, वॉल क्लायम्बिंग, कॅरम, टेबल टेनिस, बॅडमिनटन अशा विविध खेळांच्या स्पर्धा रंगत आहेत. राज्यभरातील विविध शाळा, कॉलेज, क्लब, संघटना यामधील ४ हजाराहून अधिक खेळाडू यात सहभागी झाले आहेत. विजेत्या खेळाडूंना एकूण १२ लाखांची पारितोषिके दिली जात आहेत. मुंबईची १४ वर्षाखालील टेबल टेनिसपटू भूमी पितळेने अनुष्का जिरांगेचा पराभव करत सुवर्णपदक पटकावले.
आयपीएलमध्ये आठही संघ तुल्यबळच
आयपीएलमध्ये कोणता संघ विजेतेपदाचा प्रबळ दावेदार आहे, हा प्रश्न सध्या सर्वांनाच पडला आहे. मला वाटते की, गेल्या दहा वर्षांची कामगिरी पाहता, मुंबई इंडियन्स, चेन्नई सुपरकिंग्ज, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि कोलकाता नाइट रायडर्स हे संघ मजबूत आहेत आणि त्यांच्याकडेच सर्वांचे लक्ष असते. त्याचे कारणही तसेच आहे. या संघांचे आयकॉन्स खेळाडू हे स्टार आहेत किंवा त्या संघाचे मालक तरी लोकप्रिय आहेत.
आठही संघ तुल्यबळ आहेत, शिवाय खेळाडूंची यादी पाहिली तर कोणता संघ सर्वात मजबूत आहे, हे सांगणे कठीण होईल. परदेशी खेळाडू, युवा खेळाडू व अनुभवी भारतीय यांचे मिश्रण संघाला मजबूत बनविते, हे सर्वच संघांतील साम्य आहे. आयपीएल ही इंग्लिश फुटबॉल प्रीमियर लीगसारखी वाटते. या लीगमध्ये सुरुवातीलाच चार प्रमुख संघ कोणते असतील, हे सांगता येते. मात्र, आयपीएलमध्ये हे सांगणे कठीण होते. गेल्या वर्षी चेन्नईच्या कामगिरीवर सुरुवातीला प्रश्नचिन्ह होते. मात्र, तेच विजेते ठरले होते.