सासवड पोलिसांची धडक कारवाई पुण्यातील चोरट्याला वाघापुर(ता.पुरंदर)येथुन अटक
पुण्यातील तुळशीबागमध्ये असणाऱ्या मंदिरातील देवाचे दागिने व मंदिरातील पुजार्याचा मोबाईल चोरून फरार झालेल्या चोरट्याला सासवड पोलिसांनी धडक कारवाई करत वाघापूर (ता. पुरंदर) येथील संस्कृती मिसळ या हॉटेलमधून अटक केली असून ,आरोपीचे नाव शंकर सुखदेव कांबळे (वय २० वर्षे रा.पाडोळी ता.उस्मानाबाद) अआहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती पुढीलप्रमाणे पुण्यातील तुळशी बागेमध्ये असणाऱ्या राम मंदिरातील राम व लक्ष्मणांच्या पायातील चांदीचे ३०० ग्रॅम वजनाचे चाळ आणि मंदिराचे पुजारी संकेत मेंहदळे यांचा मोबाईल चोरी झाल्याचा प्रकार दिनांक १ मे रोजी सकाळी सातच्या सुमारास मंदिरातील पुजारी संकेत मेहेंदळे हे नेहमीप्रमाणे मंदिरात आल्यावर पूजा करण्यासाठी नळावर पाणी आणण्यासाठी गेले होते त्याच दरम्यान चोरी गेल्याचे त्यांच्या निदर्शनास आले त्यानंतर विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. मंदिरातील सीसीटीवी मध्ये या चोराचा फोटो कैद झालेला होता. तो फोटो टीव्ही चँनेल आणि सोशल मिडियावर व्हायरल झाला होता. पुण्या शहरातील मध्यवर्ती आणि वर्दळीच्या ठिकाणी अशा प्रकारे देवाच्या गाभाऱ्यातील दागिने चोरीला गेल्यामुळे मोठी खळबळ उडाली होती तसेच मंदिरातील दागिन्यांची चोरी हा भाविकांच्या धार्मिक भावनांशी निगडित विषय असल्यामुळे प्रकरण गांभीर्य अधिक होते.
सासवड पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहिती तून पुरंदर तालुक्यातील वाघापूर येथील संस्कृती मिसळ या हॉटेलमध्ये सदर गुन्ह्यातील आरोपी आढळून आल्याची खबर मिळाली होती खबरी वरून सासवड पोलिसांनी धडक कारवाई करत याठिकाणी पोहोचून आरोपीला तात्काळ अटक केली याठिकाणी आरोपी शंकर कांबळे हा आज सकाळ पासुनच वेटरचे काम करत होता .सुरुवातीला आरोपीने आपण निरपराध असल्याचा कांगावा करून बनाव केला मात्र पोलिसी खाक्या दाखवल्यानंतर आरोपीने सदर गुन्ह्याची कबुली दिली असून आरोपी कडून मंदिरातील पुजारी यांचा मोबाईल जप्त करण्यात आला असून चोरी केलेले दागिने पुण्यातील बहिणीकडे ठेवले असल्याची आरोपीने कबुली दिली आहे सासवड पोलिसांनी विश्रामबाग पोलिसांशी संपर्क केला असून सदर आरोपी विश्रामबाग पोलिसांकडे सुपूर्द करणार असून गुन्ह्याचा पुढील तपास विश्रामबाग पोलिस करणार आहेत अशी माहिती सासवड पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अण्णासाहेब घोलप यांनी दिली.
या धडक कारवाईत सासवड पोलिस स्टेशनचे बी.डी.आरडे,व्ही.एस.शेटे,एस.एम.चांदगुडे, एम.एम.खरात या पोलिस कर्मचाऱ्यांनी सासवड पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अण्णासाहेब घोलप यांच्या मार्गदर्शनाखाली अतिशय महत्त्वपुर्ण कामगिरी केली.
पुण्यातील सराईत गुन्हेगार हसन शेख याची कोडीत (ता.पुरंदर)येथे गोळीबार व कोयत्याने हल्ला करून निर्घृण हत्या
हसन शेख हा पुण्यातील सिंहगड रोड पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार होता.आज सकाळी दि.२मे गुरूवार हसन शेख हा नारायणपुर येथून त्याच्या कारने जात होता. त्यावेळी अज्ञात हल्लेखोरांच्या एका बोलेरोने त्याच्या कारला धडक दिली. त्यानंतर त्याच्यावर गोळीबार केला. एकुण १३ गोळ्या झाडण्यात आल्या त्यापैकी ४ गोळ्या हसन शेखला लागल्या त्यानंतर त्याला गाडीतून बाहेर काढून त्याच्यावर कोयत्याने सपासप वार करून त्याचा निर्घृणपणे खून करण्यात आला. त्यानंतर हल्लेखोर पसार झाले. सासवड पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून त्याचा मृतदेह ताब्यात घेतला आहे.शवविच्छेदनासाठी ससून इस्पितळात मृतदेह पाठविण्यात आला आहे.
//////////////////////////////////////
हसन शेखच्या हल्ल्यामागील पुर्वोतिहास
२०१५ मध्ये त्शहसन अब्दुल जमील शेख याच्या हॉटेल राज गार्डनर येथे त्याच्यावर हल्ला झाला होता. त्यावेळी त्याच्यावर गोळीबार करण्यात आला होता. या हल्ल्यात तो गंभीर जखमी झाला होता. त्यानंतर तो काही काळ कोमात होता. त्यातून सावरल्यानंतर त्याने आता हॉटेल आणि इतर व्यवसाय सुरु केले होते. त्यावेळी पोलिसांनी त्याच्यावर हल्ला करणाऱ्यांना अटक केली होती. त्याच्या खुनाची सुपारी दिली असल्याचा संशय होता. आज सकाळी पुन्हा त्याच्यावर अशाच प्रकारे हल्ला करून खून करण्यात आला.
//////////////////////////////////////////////////////////////
सासवड शहरात दुचाकीवरून चोरट्यांनी रस्त्याने पायी चाललेल्या महिलेच्या गळ्यातील मंगळसुत्र चोरले.ही घटना २९ एप्रिल (सोमवार) रोजी सायंकाळी ५ वा. ते ६ वा. चे दरम्यान घडली असुन यासंदर्भात सुषमा बाळासाहेब बोरकर (वय ३८ वर्षे व्यवसाय घरकाम रा. सोनोरी रोड बोरकर मळा गणपती मंदीराजवळ शिवकुंज निवास सासवड ता. पुरंदर जि. पुणे) यांनी सासवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
याबाबत सासवड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दि.२९ एप्रिल रोजी सायंकाळी ५ते ६ च्या दरम्यान फिर्यादी सुषमा बोरकर या व त्यांची मुलगी प्रज्ञा या गणेश मंगल कार्यालया येथील म्हेत्रे बिल्डिंग जवळच्या रस्त्याने जात असताना पल्सर मोटार सायकल वरिल दोन अज्ञात चोरट्यांनी पाठीमागुन मोटार सायकल वर येउन बोरकर यांच्या गळ्यातील २० ग्रॅम वजनाचे 40000 रूपयांचे मणीमंगळसूत्र जबरीने चोरुन नेले.याबाबतीत दोन अज्ञात चोरट्यां विरोधात सासवड पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असुन सासवड पोलीस स्टेशनचे पोलिस निरीक्षक ए. बी. घोलप यांच्या मार्गदर्शनाखाली सह.पोलिस निरीक्षक एन. आर. चौखंडे पुढील तपास करीत आहे.
पुणे कोलाड महामार्गावर भीषण अपघात. …
ताम्हिणी गावच्या ओढयात खाजगी मिनी बस कोसळुन झालेल्या अपघातात दोघांचा मृत्यु, तर बावीस जण गंभीर जखमी झाले आहेत.
पुण्याहून कोकणातील केळशी सागरी किनारा फिरायला निघालेल्या खाजगी मिनी बसला ताम्हाणी गावच्या अलीकडे असलेल्या वाघुरणेच्या ओढयात 20 फूट खोल खड्ड्यात पडून झालेल्या अपघातात पुण्यातील एका महिलेचा जागीच मृत्यू, तर दुसर्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर यातील बावीस जण गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात आज (शनिवार, दि.27) पहाटे पुणे-कोलाड रस्त्यावरील ताम्हिणी (ता.मुळशी) गावच्या हद्दीत झाला.
संजीवनी निवृत्ती साठे (वय-५३), रा.औंध, पुणे आणि योगेश पाठक, रा. नवी पेठ, पुणे हे दोघे जण अपघातात मृत्यु झाले आहेत. याबाबत आर्य जयेश केळकर, वय-१६, रा.वारजे, पुणे यानी पौड पोलिसांत खबर दिली.
या अपघातात निवृत्ती साठे, श्रावणी पाठक, ऋषीकेश कोंढाळकर, पुष्पा कोंढाळकर, पुनम योगेश लांडे, हर्षवर्धन योगेश लांडे, दक्ष जाधव, रियांश जाधव, ऋषा जाधव, शितल विशाल काळे, विशाल शिवाजी काळे, लौकिक विशाल काळे, स्मिता विलास सुर्यवंशी, रेश्मा प्रशांत जाधव, बाळासाहेब पवार, तनिष्का गोफणे, माणिक काळे, अनघा जाधव, अनिल पवळे, प्रभा पवार, विधिता जाधव, वाहनचालक (नाव माहित नाही) हे जखमी झाले आहेत. यातील लहान मुलांना किरकोळ मार लागला असून बाकी सुखरुप आहेत.
याबाबत पौड पोलिसांनी दिलेली माहिती अशी, अपघात झालेले सर्वजण पुण्यातील नवी पेठ, सांगवी परिसरात राहणारे असून ते सर्वजण एकमेकांचे नातेवाईक आणि मित्र आहेत. कोकण सागरी किनारा फिरण्यासाठी पुण्याहून केळशी बीच येथे जाण्यासाठी काल रात्री साडेबारा वाजता खाजगी मिनी प्रवाशी बस क्रमांक एम एच १२, केक्यु ६७६८ हिने निघाले. पुणे, चांदणी चौक मार्गे हि बस पौड हून मार्गस्थ होत असताना पहाटे अडीच वाजताच्या ताम्हिणी गावच्या अलिकडे असलेले वळण वाहनचालकांना लक्षात नाही न आल्याने मिनी बस वाघुरणेच्या ओढयात 20 फूट खोल खड्ड्यात कोसळली. बस वीस फुट खोल कोरडया ओढयात कोसळुन पलटी खाल्याने अनेकांना मोठया प्रमाणात मार लागला. तर बरेच जन बस मध्ये अडकुन पडले होते.
याबाबत अधिक तपास पोलीस निरीक्षक अशोक धुमाळ हे करत आहे.
ज्योतिबा भोसले यांची पोलीस उपनिरीक्षक पदी निवड
सासवड ( ता. पुरंदर
) येथील पोलीस ठाण्यातील पोलीस नाईक ज्योतिबा मनोहर भोसले यांची पोलीस उपनिरीक्षक पदी निवड करण्यात आली आहे. पोलीस खात्यांतर्गत २०१६ मध्ये पोलीस उपनिरीक्षक पदाची परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची यादी नुकतीच प्रसिद्ध करण्यात आली. यामध्ये पोलीस नाईक ज्योतिबा भोसले यांची निवड करण्यात आली आहे.लातूर जिल्ह्यातील किल्लारी हे ज्योतिबा भोसले यांचे मूळ गाव आहे. २००६ साली पोलीस खात्यात भरती झाल्यानंतर प्रथम पुणे जिल्हा ग्रामीण मध्ये लोणी काळभोर येथून सेवा करण्यास प्रारंभ केला. त्यानंतर सध्या ते सासवड पोलीस ठाण्यात पोलीस नाईक या पदावर कार्यरत आहेत. या निवडी नंतर भोर उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब जाधव, तसेच पोलीस निरीक्षक अण्णासाहेब घोलप, सहायक पोलीस निरीक्षक निरंजन चौखंडे, संदीप शेंडगे, पोलीस उपनिरीक्षक श्रीनिवास सावंत, चेतन थोरबोले त्याच प्रमाणे सर्व पोलीस कर्मचाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
सासवड एसटी आगार बनले अस्वच्छतेचे आगार’
आगारात ठिकठिकाणी कच-याचे ढीग,हजारो प्लॅस्टिक बाटल्यांचा खच
सासवडचे एसटी आगार आणि या आगारातील असुविधा, अस्वच्छता याकरिता कायमचं चर्चेत असते.मध्यंतरी तब्बल दोन वर्ष सासवड बसस्थानकात महिला प्रवाशांसाठी शौचालयाची सोयच नव्हती बसस्थानक नुतनीकरण करणाच्या रखडलेल्या कामामुळे अक्षरशः महिलांना उघड्यावरच नैसर्गिक विधी उरकावा लागत होता सामाजिक संस्था आणि पत्रकारांनी वारंवार केलेल्या पाठपुराव्यामुळे संत सोपानकाका बँकेने महिला प्रवाशांसाठी शौचालय उपलब्ध करून दिले आणि महिला प्रवाशांची कुचंबणा थांबली होती.आचारसंहिता लागु होण्याआधी घाईघाईने बसस्थानक उद्घाटन समारंभ मोठ्या थाटामाटात उरकण्यात आला मात्र पुरूष मुतारी तुंबलेल्या स्थितीत असुन बसस्थानकावर प्रचंड दुर्गंधी पसरलेली आहे.यामुळे रोगराई पसरण्याची दाट शक्यता निर्माण झाली असुनही आगार व्यवस्थापकांचे याकडे दुर्लक्ष होत आहे.
सासवडचे एसटी आगार हे सध्या अस्वच्छतेचे आगार बनले आहे.सासवड आगारातील आगार व्यवस्थापक यांच्या कार्यालयाच्या समोरच असलेली कचरा कुंडी तब्बल सहा महिन्यांपेक्षा अधिक काळापासून कच-याने काठोकाठ भरलेल्या स्थितीत सुन कचराकुंडीच्या आजुबाजुला तर पिण्याच्या पाण्याच्या हजारो प्लॅस्टिक बाटल्यांचा खचच पडलेला आहे.ज्यांना आपल्या कार्यालयाच्या समोरील कच-याचे आणि घाणीचे साम्राज्य दिसत नाही त्यांच्या कडुन बसस्थानकातील स्वच्छता आणि चांगल्या सोयीसुविधांबाबत अपेक्षा करणे केवळ अशक्यच गोष्ट म्हणावी लागेल.या पिण्याच्या पाण्याच्या बाटल्यांचा खच आगारात तीन-चार ठिकाणी पडलेला असुन या रिकाम्या बाटल्यांमध्ये साचलेल्या पाण्यामुळे डेंग्यू आणा मलेरिया सारखे आजार पसरण्याची गंभीर आणि धोकादायक परिस्थिती निर्माण झाली असुनही याकडे सासवडच्या एसटी प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष होणे हीदेखील अतिशय खेदजनक आणि आश्चर्यकारक बाब बनली आहे.
एकीकडे संपूर्ण देशात भारत स्वच्छता अभियान मोठ्या दिमाखात साजरे केले जात आहे.सासवड नगरपालिका एकीकडे स्वच्छतेसाठी पुढाकारातून देशात प्रथम क्रमांक मिळवते आणि एसटी प्रशासन मात्र स्वच्छतेच्या संदर्भात इतके उदासीन असल्याचे विरोधी चित्र सासवडकरांच्या आणि एसटीच्या प्रवाशांच्या प्रवाशांसाठी धोकादायक ठरू शकते.
सासवड शहरातील संत नामदेव शाळा येथील सखी मतदान केंद्र हे २०१९ लोकसभा निवडणुकीतील खास आकर्षण बनले होते.निवडणूक आयोगाने खास महिला मतदारांच्या संख्येत वाढ करण्याच्या हेतुने हा नाविन्यपूर्ण आणि उल्लेखनीय उपक्रम राबविण्यात आला होता. या मतदान केंद्रात सर्व महिला कर्मचारी नियुक्त करण्यात आल्या होत्या. तसेच फुगे,फुले,यांची सजावट करून हे मतदान केंद्र सजवण्यात आले होते रांगोळी काढुन ,मंडम टाकण्यात आला होता.सकाळी पहिल्या १०० मतदरांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले.याठिकाणी मतदानाचे महत्त्व पटवुन देणारे विविध पोस्टर लावण्यात आले होते.
पुरंदर तालुक्यात लोकसभेचे सरासरी ६५टक्के मतदान
पुरंदर तालुक्यात लोकसभा निवडणूक शांततेत पार पडली
२०१९ लोकसभा निवडणुकीतील तिस-या टप्प्यातील मतदान आज पार पडले.देशातील बहुचर्चित आणि प्रतिष्ठेची बनलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघाचे मतदान आज शांततेत पार पडले.पुरंदर तालुक्यातील सर्वच मतदान केंद्रावर प्रशासनाने चोख आणि कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता. तालुक्यातील एकुण मतदान ६० टक्के झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात आला आहे.उन्हाचा प्रभावही आज मतदानावर झाल्याचे दिसुन आले.सकाळी ठराविक मतदान केंद्रावर मतदारांच्या रांगा लागलेल्या होत्या दुपारी १ ते ४ च्या दरम्यान मतदान केंद्रांवर गर्दी कमी होती.दुपारी चार नंतर मतदारांनी घराबाहेर पडुन मतदान केंद्रावर गर्दी केली होती.
तालुक्यातील ग्रामीण भागातही मोठ्या प्रमाणात मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.मतदारांमध्ये महिला मतदारांची संख्या ही उल्लेखनीय होती.
‘ नाथ साहेबांचं चांगभले ‘ जयघोषात सासवडच्या श्री भैरवनाथांच्या पालखीची ग्रामप्रदक्षिणा
२० ते २१ एप्रिल या काळात सासवडच्या भैरवनाथांची यात्रा
शनिवार (२० एप्रिल) रोजी पहाटे देवांना अभिषेक घालुन पोषाख घालण्यात आला. यानंतर सासवडची श्री भैरवनाथांच्या यात्रेची सुरुवात झाली. सायंकाळी पालखी फुलांनी सजविण्यात आली. त्यानंतर रात्री मंदिरात आरती होऊन संग्राम भिकाजी पाटील यांचे हस्ते उत्सव मुर्तींना पालखीत ठेवण्यात आले. या वेळी ‘ नाथ साहेबांचं चांगभले ‘ जयघोष करीत भाविकांनी गुलालाची उधळण करण्यांत आली.
याच वेळी पालखीतील श्रींची पुजा मानकरी यांनी केली. फटाक्याची आतीषबाजी व विविध बॅंड पथक, ढोलपथक, छबिणे व पारंपारीक वाद्यांच्या गजरात पालखीने ग्रामप्रदक्षिणेस सुरुवात झाली. गावातील पालखीचे महिलांनी औक्षण करुन स्वागत केले. पालखी दर्शनासाठी चौकाचौकात मोठी गर्दी होती. पुणे जि.काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष संजय जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली यात्रेचे नियोजन करण्यात आले.
यावेळी भैरवनाथ चैत्री उत्सव मंडळाचे अध्यक्ष पिंटूशेठ हिवरकर , उपाध्यक्ष कौशिक जगताप, भैरवनाथ ट्रस्टचे अध्यक्ष जयसिंग बाबु जगताप , उपाध्यक्ष चंद्रकांत ज. गिरमे, सचिव दिनकरनाना जगताप, विजय वढणे, रामभाऊ वढणे, विलासकाका जगताप, नंदकुमार दिवसे, पांडुरंग भोंगळे, मोहन जगताप, बाजीराव इनामके, राजाभाऊ जगताप, रावसाहेब इनामके, चंद्रकांत ज. गिरमे, जयवंत जगताप, जयसिंग जगताप आदी उपस्थित होते.
२१ एप्रिल रोजी सायंकाळी ५ वाजता भैरवनाथ कुस्ती आखाड्यात जंगी कुस्तीचा आखाडा होईल. याच दिवशी रात्री ९ वाजता सवाल माझा ऐका हा मराठी चित्रपट बुधवार दि. २४ एप्रिल करते तुम्हा मुजरा हा कार्यक्रम कन्हैय्या चौकात होईल. २५ रोजी मदमस्त अप्सरा हा कार्यक्रम पालखी मैदान क्रमाक २ वर होईल अशी माहिती भैरवनाथ चैत्री उत्सव मंडळाचे अध्यक्ष पिंटूशेठ हिवरकर व उपाध्यक्ष कौशिक जगताप यांनी दिली.
घेरा पुरंदर (ता.पुरंदर) हद्दीतील पुरंदर किल्ला येथे ट्रान्जेट मिस्कर वाहनाच्या अपघातात तीन मजुर जागीच ठार झाली असुन तीन मजुर गंभीर जखमी झाल्याची दुर्घटना घडली आहे. याबाब प्रशांत भुजीगा धुळूगडे( वय 28 वर्षे रा. मु .पो. सुळकुड ता. कागल जि. कोल्हापुर ) यांनी फिर्याद दिली असुन
आरोपी १)राजकुमार रामकरण विश्वकर्मा (वय 23 वर्षे धंदा चालक रा. घर नंबर 23 हाटवा बरहटोला पो. हाटवा खास ता. सिहवल जि. सिध्दी मध्यप्रदेश )या दोघांना अटक केली आह. याबाबत सासवड पोलिसांनी दिलेली सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे दिनांक १७ एप्रिल रोजी सायंकाळी ५.४५ वाजण्याच्या सुमारास मौजे घेरा पुरंदर (ता.पुरंदर)गावचे हद्दीतील पुरंदर किल्ला येथे पुरंदर किल्ल्या वरील पुरंदर तळ्याचे दुरुस्ती करण्याचे काम चालू असून यातील आरोपीने आपल्या ताब्यातील ट्रान्जेट मिक्सर (गाडी नंबर एम एच १२ एफ. सी. ६०२६) ही माल भरून किल्ल्याचे मेनगेट वर असणारे बंचिंग प्लांट वरून माल भरुन मुरारबाजी चौक येथे असणारे तलावांमध्ये माल खाली करण्याकरता गेला असता तेथे गेल्यावर चौकातून वाहन वळवून मेन गेटवर घेत असताना उतारावर त्याला वाहन कंट्रोल न झाल्याने मिक्सर मागे आला खाली दरीमध्ये सुमारे वीस फूट खाली पडला यातील चालक आरोपी राजकुमार रामरमण विश्वकर्मा याने गाडीतून बाहेर उडी मारली त्यामध्ये कामगारांना गंभीर दुखापत झाली असून वाहनाचा मिक्सर व बॉडी वेगळी झाली आहे अपघातामध्ये कामगारांना कमी अधिक प्रमाणात गंभीर दुखापती झाल्या असून त्यामध्ये तीन लोक हे जागीच मयत झालेले आहेत. या मयतांची नावे पुढीलप्रमाणे- १)आनंद कंपनी वय 20 वर्ष राहणार मध्य प्रदेश)
२) मोनो रमेश बैगा( वय २१ वर्ष राहणार मध्य प्रदेश
३)अनिल ब्रिजनंदन पनिका( वय २१ वर्षे राहणार मध्य प्रदेश)
सासवड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक ए. बी. घोलप पुढील तपास करीत आहेत.