मावळ लोकसभा मतदारसंघात उमेदवारी अर्ज भरण्याचा कालावधी २ एप्रिल २०१९ पासून सुरू झाला असला तरी सुरुवातीचे दोन दिवस एकाही इच्छुकाने अर्ज भरला नव्हता. गुरुवारी एका अपक्ष उमेदवाराने अर्ज भरुन मावळचे खाते उघडले आहे. अद्याप उमेदवारी अर्ज भरण्यासाठी इच्छुक “महुर्ताचा’ शोध घेत असल्याचे चित्र पहायला मिळत आहे. गुरुवार दि.४ एप्रिल पर्यंत ३४ उमेदवारी अर्जाची व्रिकी झालेली आहे. दि. ४ एप्रिल रोजी केवळ एका उमेदवाराने अपक्ष म्हणून आपला उमेदवारी अर्ज भरला आहे. आता, प्रमुख उमेदवार “गुढीपाडव्या’नंतरच शुभ महुर्तावर अर्ज भरतील अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.
