रिझर्व्ह बॅंकेने सलग दुसऱ्या पतधोरणात आपल्या मुख्य व्याजदरात म्हणजे रेपो दरात पाव टक्क्यांनी कपात केली आहे. मात्र व्यावसायिक बॅंकांनी त्याप्रमाणात आतापर्यंत आपल्या कर्जावरील व्याजदरात कपात केलेली नाही. त्यामुळे रिझर्व्ह बॅंक व्यावसायिक बॅंकांना आपल्या विविध कर्जावरील व्याजदरात कपात करण्याचा आग्रह करणार आहे.
